Pune Crime News : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून | पुढारी

Pune Crime News : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केल्याची घटना मंगळवारी वारजे भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली. उमा ऊर्फ पूजा लखन कांबळे (वय 25) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती लखन कांबळे (वय 28) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे दाम्पत्य मूळचे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आहे. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करायचे. लखन गेल्या काही दिवसांपासून काही काम करीत नव्हता. मंगळवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. लखनने उमाच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार केले. तिचा जागीच मृत्यू झाला.

पाच तासांत आरोपी जेरबंद

खून केल्यानंतर लखन कांबळे याने पळ काढला होता. तो परत येत असताना पोलिसांना मिळून आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर, गुन्हे निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, प्रदीप शेलार, हनुमंत मासाळ, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, अमोल सुतार यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

Back to top button