Weather Update : शहरात हुडहुडीची वीण घट्ट | पुढारी

Weather Update : शहरात हुडहुडीची वीण घट्ट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात शनिवारी पुणे शहर सर्वाधिक गारठल्याची नोंद झाली. एनडीए 10.5, पाषाण 10.6 तर शिवाजीनगरचा पारा 11.9 अंशांपर्यंत खाली आला होता. हंगामात दुसर्‍यांदा शहराचा पारा राज्यात नीचांकी ठरला. शहराचे किमान तापमान 13 ते 18 अंशांवर गेले होते. मात्र, शनिवारी शहरातील एनडीए, शिवाजीनगर आणि पाषाण भागाच्या किमान तापमानात अचानक घट झाली. त्यामुळे सायंकाळी 7 नंतर शहरात अचानक गारठा जाणवू लागला. शहरात पहाटेचा गारठा आहेच. शनिवारी सायंकाळपासून गारठा जाणवू लागला होता.

शहरात आगामी पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पहाटेचे धुके अधिक दाट पडेल व दिवसा उशिरापर्यंत धुक्याची चादर शहरावर राहील. एनडीएचा पारा शहरात 10.5, तर शिवाजीनगरचा पारा 11.9 अंशांवर असताना राज्यात शिवाजीनगरची नीचांकी म्हणून नोंद कशी झाली, याचा खुलासा पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी केला. ते म्हणाले, शिवाजीनगर हे शहरासाठी प्रमाण मानले आहे. त्यामुळे तेथील तापमान राज्यासाठी अधिकृत गृहीत धरले जाते.

हेही वाचा

Back to top button