पुणे: ‘कर्मयोगी’चे संचालक राहुल जाधव यांचा राजीनामा: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज | पुढारी

पुणे: 'कर्मयोगी'चे संचालक राहुल जाधव यांचा राजीनामा: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज

शेळगाव: पुढारी वृत्तसेवा :  इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव  पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल विठ्ठल जाधव यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा सोमवारी( दि.१३)  प्रशासनाकडे जमा केला. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी सहकारमंत्री,  शंकरराव पाटील कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे जाधव निष्ठावान कार्यकर्ते होते.  Rahul Jadhav vs Harshvardhan Patil

राहुल जाधव यांनी सांगितले की, आमची चौथी पिढी पाटील परिवाराशी एकनिष्ठेने खंबीरपणे पाठीमागे उभी आहे. दिवंगत खासदार शंकरराव बाजीराव पाटील तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलेले आहोत. मागील काही काळापासून हर्षवर्धन पाटील यांच्याकडून वाईट वागणूक मिळत असल्याने राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे गावोगावी पक्ष संघटना बळकट करा, असे जाहीर सभेत सांगायचे आणि दुसरीकडे पक्षातील माणसाकडून पक्षातीलच माणसाचे खच्चीकरण करायचे अशा हे दुप्पटी भूमिकेमुळे मी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. हर्षवर्धन पाटील यांची आजपासून साथ सोडत असून लवकरच पुढील दिशा व पक्ष ठरवणार आहे. Rahul Jadhav vs Harshvardhan Patil

शेळगावचे जाधव व बावड्याचे पाटील यांचे अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध इंदापूर तालुक्याला माहित आहेत. इंदापूर तालुक्यातील माळी समाजामध्ये विठ्ठल जाधव व राहुल जाधव यांना मोठा मान व सन्मान आहे.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला   नाही.

हेही वाचा 

Back to top button