Pimpri News : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

Pimpri News : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विरुद्ध दिशेने जाणार्‍या एका टेम्पोने दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 7) रात्री पावणेबाराच्या सुमारास मुकाई चौक येथील शितळानगर अंडरपास जवळ घडली.

विकास गोरख ठोंबरे (42, रा. देहूरोड), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी आनंद दिगंबर जाधव (30, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) या टेम्पोचालकास अटक केली आहे. याप्रकरणी किरण गोरख ठोंबरे (34, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा

Back to top button