Pune : शेटफळगढे गटात पुढार्‍यांना प्रवेशबंदी | पुढारी

Pune : शेटफळगढे गटात पुढार्‍यांना प्रवेशबंदी

भिगवण : पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणासाठी इंदापूर तालुक्यातील मराठा समाजबांधवदेखील एकवटले आहेत. त्यानुसार भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये राजकीय पुढार्‍यांना प्रवेश बंदीचा निर्णय भिगवण येथील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषद गटात नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेणारा राज्यातील पहिला हा जिल्हा परिषद गट ठरला आहे. अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भिगवण सकल मराठा समाजाच्या वतीने येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटामधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आरक्षण मिळेपर्यंत ही गावबंदी घालण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. त्यासाठी सर्वच गावच्या सरपंचांनी लेखी हमी देण्याचे मान्य केले. याबाबतचे पत्र इंदापूर व दौंड तहसीलदार यांना देण्यात येणार आहे. तसेच रविवार (दि. 29)पासून भिगवण येथील भैरवनाथ मंदिरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करण्याचाही निर्णय या वेळी घेण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button