ट्रक अंगावरून गेल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू | पुढारी

ट्रक अंगावरून गेल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

निरा : पुढारी वृत्तसेवा : निरा (ता. पुरंदर) येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ एका ज्येष्ठ नागरिकाचा अंगावरून ट्रक गेल्याने जागीच मृत्यू झाला. शनिवारी (दि. 21) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाबासाहेब संतराम मारकड (वय 70) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. ते जेजुरी येथील रहिवासी आहेत.

निरा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की निरेहून जेजुरीकडे चाललेला ट्रक (एमएच 12 इएफ 9157) हा निरा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरून जात होता. त्या वेळी बसस्थानकाकडे जात असलेल्या बाबासाहेब मारकड यांना ट्रकने धडक दिली. ते ट्रकच्या चाकाखाली आल्याने मारकड यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष बाळासाहेब जगताप (वय 38, रा. निमोणे, ता. शिरूर) असे ट्रकचालकाचे नाव आहे.

निरा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार संदीप मदने, पोलिस जवान नीलेश जाधव, होमगार्ड व स्थानिक युवकांनी मदत करून मारकड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून पाठविला. घटनेचा तपास जेजुरी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

मावळात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा

दिल्लीत लग्नाला नकार दिल्याने स्वीस महिलेचा हात-पाय बांधून खून

गुंजाळवाडीत भाजपविरुद्ध एकास-एक उमेदवार : आ. थोरातांची रणनीती

Back to top button