Temperature Rise : जळगावच सर्वात ‘हॉट’; शहराचा पारा 37 अंशांवर! | पुढारी

Temperature Rise : जळगावच सर्वात 'हॉट'; शहराचा पारा 37 अंशांवर!

पुणे : जळगाव शहराचे मंगळवारी तापमान राज्यातच नव्हे तर देशात सर्वोच्च ठरले. देशभरात कमाल तापमानाचा पारा 34 अंशावर आहे. विदर्भ, उत्तर व मध्य महाराष्ट्रही तापला असून पुणे शहरातील कोरेगाव पार्कचे तापमान 36 अंशावर गेले होते.
मंगळवारी मान्सून उत्तर, मध्य भारतासह 90 टक्के देशातून परतला. आता तो कर्नाटक व केरळात आहे. त्यामुळे देशात कोरडे
आणि शुष्क वातावरण आहे. त्यामुळे देशाचे सरासरी कमाल तापमान 33 ते 34 अंशावर आहे; तर महाराष्ट्राने देशात आघाडी घेत सरासरी पारा 34 ते 35 अंशावर गेला आहे. मंगळवारी जळगावचे तापमान देशात सर्वोच्च 37 अंश सेल्सिअसवर गेले होते.

तापलेली शहरे

जळगाव 37, सोलापूर 36, कोरेगाव पार्क (पुणे) 36, मुंबई (सांताक्रूज) 35.6, मुुंबई 33, कोल्हापूर 33.6, नाशिक 33, सांगली 34, सातारा 32, रत्नागिरी 34, छत्रपती संभाजीनगर 34.4, परभणी 34.5, बीड 32, अकोला 36.5, अमरावती 35.4, ब्रह्मपुरी 36.8, चंद्रपूर 33.8, गोंदिया 34.5, नागपूर 34.4, वाशिम 36, वर्धा 35, यवतमाळ 35.

मध्य महाराष्ट्रात पुणे शहर टॉपवर

मध्य महाराष्ट्रातही विदर्भ, उत्तर महाराष्ट्राच्या खालोखाल तापला आहे. पुणे शहरातील तापमानाचा विचार केला तर कोरेगाव पार्क 36, शिवाजीनगर 35, चिंचवड 35 अंशावर गेले आहे.

हेही वाचा

Jammu | पाकची पुन्हा आगळीक, जम्मूच्या सीमेवर गोळीबार, बीएसएफचे २ जवान जखमी

Nashik News| आठ दिवसांत अवैध धंदे बंद करा : पालकमंत्री दादा भुसेंचा अल्टिमेटम

NASA : ‘नासा’ने टिपली दोन महाकाय ग्रहांची धडक

Back to top button