सरकारच्या हलगर्जीपणामुळे ‘समृद्धी’वर अपघात : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

सरकारच्या हलगर्जीपणामुळे ‘समृद्धी’वर अपघात : खासदार सुप्रिया सुळे

पुणे : समृद्धी महामार्गाची निर्मिती करताना सुरक्षिततेचा विचार केला गेला असे दिसत नाही. समृद्धी महामार्गावर सुधारणा का घडू शकत नाही, असा प्रश्न असून, हे प्रकार फक्त सरकारच्या हलगर्जीपणामुळे होत आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुळे या पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकामध्ये अजित पवार यांच्या उल्लेखावरुन सुरु झालेल्या चर्चेबद्दल सुळे म्हणाल्या, मी पुस्तक वाचलेले नाही. या पुस्तकावर स्पष्टीकरण मी देऊ शकत नाही. मी याबद्दल बोलणे योग्य होणार नाही.

संबंधित बातम्या :

मनोज जरांगे यांची सभा झाली, त्याची स्क्रीप्ट शरद पवार यांनी लिहिली होती, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला असून, त्याबद्दल विचारणा केली असता सुळे म्हणाल्या, सत्ताधार्‍यांनी एक गोष्ट कबूल केली पाहिजे की, सहा दशके त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांची हेडलाइनच होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काही झाले तरी शरद पवारच करतात, हे बोलले जाते, याच्यातच शरद पवारांची ताकद आहे, मी यावर वेगळे काही बोलण्याची नाही. सरकारनेच जरांगेंकडे 40 दिवस मागितले होते. त्यामुळे सरकारनेच विचार करायला हवा होता की, चाळीस दिवसात सोल्युशन आहे की नाही.

Back to top button