मोबाईल चोरणाऱ्या दोघांना नारायणगाव पोलिसांनी ठोकल्या 24 तासात बेड्या | पुढारी

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना नारायणगाव पोलिसांनी ठोकल्या 24 तासात बेड्या

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव बस स्थानकातून मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी चोवीस तासाचे आत बेड्या ठोकल्याची माहीती नारायणगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. बुधवारी(दि.१२) दुपारी नारायणगाव बस स्थानकातून संतोष पोपट बुळे (रा. कोपर मांडवे ता.जुन्नर) यांचा मोबाईल चोरी झाल्याबद्दल नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सनील धनवे, उपनिरीक्षक जगदीश पाटील, हवालदार रमेश काटे, जवान संतोष साळुंखे यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन सुरू केला.

बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्यातील दोन संशयित विकास मालसिंग जाधव, (रा. चचेरिया ता. सेंधवा जि. बिडवणी) अर्जुन नामदेव आढाव (रा . अवसरी खुर्द ता. आंबेगाव) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे. चोरलेल्या मोबाईलची किंमत सुमारे दहा हजार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले. या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हावालदार रमेश काठे हे करीत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button