नवरात्रीसाठी ३ किलो वजनाची ‘रामराज्य’ पगडी! | पुढारी

नवरात्रीसाठी ३ किलो वजनाची ‘रामराज्य’ पगडी!

अहमदाबाद : नवरात्रीचा सण जवळ आला आहे आणि देशभरात, विशेषतः गुजरात, प. बंगालसारख्या राज्यांमध्ये नवरात्रीची जय्यत तयारी सुरू आहे. गुजरातमध्ये नवरात्रीमध्ये गरबा खेळण्याची जुनीच परंपरा आहे. त्यामध्ये पारंपरिक पोशाखालाही महत्त्व आहे. अशा पोशाखांमध्येही दरवर्षी अनेक हौशी लोक नवे काही तरी करीत असतात.

आता गुजरातच्या गांधीनगरमधील एका तरुणाने खास नवरात्रीसाठी तब्बल तीन किलो वजनाची पगडी बनवून घेतली आहे. या पगडीला ‘रामराज्य’ पगडी असे नाव देण्यात आले असून त्यामध्ये अयोध्येतील राममंदिराची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आहे.

गांधीनगरमध्ये सध्या नवरात्रीची जय्यत तयारी सुरू आहे. अशा वेळी तेथील एका तरुणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्याने आपल्या एकाच पगडीमध्ये राम मंदिर, चांद्रयान-3 आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा बसवल्या आहेत. ही पगडीच तब्बल तीन किलो वजनाची आहे. यावर्षीच्या गरब्यामध्ये त्याची ही ‘रामराज्य’ पगडी अर्थातच लोकांच्या आकर्षणाचा विषय बनून राहणार आहे. व्हिडीओमध्ये हा तरुण आपली पगडी मोठ्या उत्साहाने दाखवत असताना दिसतो. या पगडीवर समोरच्या दोन्ही बाजूस दोन सुंदर मोरही दिसून येतात.

Back to top button