Pune News : ख्यॅक ख्यॅक करीत असाल, तर गर्दी टाळा; आरोग्य विभागाचे गणेशभक्तांना आवाहन | पुढारी

Pune News : ख्यॅक ख्यॅक करीत असाल, तर गर्दी टाळा; आरोग्य विभागाचे गणेशभक्तांना आवाहन

पुणे : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. सध्या व्हायरल इन्फेक्शनची साथ असल्याने सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास गर्दीत येणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. शहरात विसर्जन मिरवणुकीला लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आजारी व्यक्तींना गर्दीचा त्रास होऊ शकतो.

त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. चेहर्‍याला गुलाल लावताना तो डोळ्यांत गेल्यास अपाय होण्याची शक्यता असते. गुलाल उधळल्याने हवेचे प्रदूषण होऊन डोळ्यांचे आणि श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते. गुलाल फक्त कपाळावर लावावा. डोळ्यांत चुकून गुलाल गेल्यास डोळे थंड पाण्याने स्वच्छ करावेत. डोळे चुरचुरणे असा त्रास होत असल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपाय करावेत.

हेही वाचा

Kolhapur Ganeshotsav : दहापर्यंतच देखाव्यांची सक्ती का?.. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सवाल

ठाणे : गतिमंद मुलीची पित्याकडूनच हत्या; मानपाडा हादरले

Nashik News : पाणीकपातीच्या संकटातून नाशिककरांना अल्पसा दिलासा

Back to top button