Bank of Maharashtra : बँक ऑफ ‘महाराष्ट्र’चा बेजबाबदारपणा; तब्बल 3 दिवस बँक उघडीच | पुढारी

Bank of Maharashtra : बँक ऑफ 'महाराष्ट्र'चा बेजबाबदारपणा; तब्बल 3 दिवस बँक उघडीच

कामशेत(पिंपरी) : मावळ तालुक्यातील कामशेत मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कामशेत येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शटरला तब्बल तीन दिवसापासून टाळे लावले नसल्यामुळे उघडीच राहिली होती. ही बाब सकाळी नऊच्या सुमारास स्थानिक व्यापारी विलास बटेवरा यांच्या लक्षात आली. त्यांनतर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून हा सर्व प्रकार त्यानां सांगितला. यानंतर बँकेचे कर्मचारी ननावरे यांनी अकरा वाजण्याच्या सुमारास बँकेला कुलूप लावले. या घटनेतून पुन्हा एकदा बँकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, मावळ तालुक्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजार पेठेत ही बँक ऑफ महाराष्ट्र कार्यकरत आहे. या बँकेत अनेक खातेदारांचे खाते असून पेन्शनर्स, नोकरदा, बचतगट, शेतकरी, व्यावसायिक, यांची खाती आहेत. कामशेत परिसरात एकमेव नॅशनल बँक असल्यामुळे लोकांना या बँकेशिवाय दुसरा पर्याय नाही. आधीच या बँकेबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यातच या घटनेमुळे बँकेचा बेजबाबदारपणा दिसून येत आहे.

शुक्रवारी संध्याकाळी चार वाजल्यानंतर शटर खाली ओढून टाळे न लावताच बँकेतील सर्व कर्मचारी तसेच निघून गेले. त्यामुळे शुक्रवार, चौथा शनिवार आणि रविवारी अकरा वाजेपर्यंत बँकचे कुलूप न लावल्यामुळे बँक तब्बल तीन दिवस उघडीच होती. यामुळे नागरींकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या बँकेत अनेक खातेदारांचे पैसे जमा असून कदाचित काही घटना घडली असती, तर याला जबाबदार कोण? असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. संबंधित मॅनेजर आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी तीव्र मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा

कोल्हापूर : शिवाजी चौकातील ‘त्या’ गणेशमूर्तीचे विसर्जन

Parineeti-Raghav wedding: आली लग्न घडी समीप;परिणीती-राघव घेणार सात फेरे

नगर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; शेतकर्‍यांमध्ये समाधान

Back to top button