दीडशे घरफोडीचे गुन्हे असलेल्या कल्याणी अटक; 22 लाखाचे 37 तोळे दागिने जप्त | पुढारी

दीडशे घरफोडीचे गुन्हे असलेल्या कल्याणी अटक; 22 लाखाचे 37 तोळे दागिने जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  तब्बल दीडशे घर पुढे चे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यावेळी त्याच्याकडून 37 तोळे वजनाचे 22 लाख 20 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.

संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (40, रा. थेऊर रोड, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. हडपसर, बिबवेवाडी, सासवड, अलंकार, लोणीकंद, खेड, कोथरूड, दत्तवाडी, पंढरपूर, वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर यापूर्वी दीडशे घर पुढचे गुन्हे दाखल असून तो मध्यरात्रीच्या सुमारास साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे करत होता. परंतु त्याने अलीकडे गुन्ह्याची पद्धत बदलली होती मध्यरात्री गुन्हे करण्याचे सोडून तो दिवसा घरपोळ्या करत असल्याचे समोर आले आहे.

अलीकडेच कल्याणी आणि कोंडव्यातील कुबेरा पार्क येथे भर दिवसा घर पुढे केली होती ओळख फोटो नाही म्हणून तो तोंडाला रुमाल बांधून डोक्यावर टोपी घालून गुन्हा करत होता आरोपी हा गुन्हा करताना कोणत्या मार्गाने आला गुन्हा केल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला या अनुषंगाने पोलिस अंमलदार सुहास मोरे राहुल थोरात, जयदेव भोसले, राहुल राजगे, सीसीटीव्ही पाहून शोध घेत असताना त्यांनी अंदाज दोनशे सीसीटीव्हींची पाहणी करून आरोपी याचा माग काढला. तो थेऊर येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. कल्याणी याला त्याच्या राहत्या घरी पकडण्यासाठी पोलीस पथक गेले होते.

पोलिस आल्याची चाहूल लागताच त्याने घराचा दरवाजा लावून घेऊन पोलिसांना चार ते पाच तास झुलत ठेवले. यावेळी तो मागील दरवाजाने पळून जाण्याच्या तयारीत होता परंतु पोलिसांनी त्याच्या घराला चारही बाजूने घेरून सापळा रचला. नंतर शर्यतीचे प्रयत्न करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. पोलिस उपायुक्त विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, अंमलदार अमोल हिरवे, विकास मरगळे, राहुल वंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

.हेही वाचा 

पूर्व उपनगरात घाटकोपर, कुर्ला येथे दहीहंडीचा उत्साह; नेते , अभिनेत्यांची उपस्थितीसह पावसाची हजेरी

विहिरीत पडलेल्या बिबट्यांच्या बछड्यांना जीवदान

तळोजामध्ये ६५ लाखांचे अमली पदार्थ जप्त; नवी मुंबई पोलिसांची कामगिरी 

Back to top button