कोल्हापूर : डोक्यात कुदळ घालून जन्मदात्या आईचा खून; मुलाला अटक

कोल्हापूर : डोक्यात कुदळ घालून जन्मदात्या आईचा खून; मुलाला अटक

कसबा वाळवे; पुढारी वृत्तसेवा : शेतात भातपेरणी करत असताना घरगुती वादातून व्यसनी मुलाने स्वतःच्या आईच्या डोक्यात कुदळ घालून तिचा खून केला. ही घटना मंगळवारी (दि.२७) बारडवाडी (ता राधानगरी) या परिसरात दुपारी दोनच्या सुमारास घडली. मालुबाई श्रीपती मुसळे (वय ६०) असे मृत आईचे नाव असून याप्रकरणी संदीप मुसळे (वय ३५) या व्यसनी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

बारडवाडी येथील संदीप मुसळे हा गवंडी काम करतो. त्याला दारूचे व्यसन असल्याने घरी आल्यानंतर तो नेहमी आई-वडिलांबरोबर घरगुती कारणावरून वाद घालायचा. आज सकाळी आपली आई, वडील व पत्नीसोबत भैरीकडा नावाच्या शेताकडे  भातपेरणीसाठी गेला होता. यादरम्यान शेतात काम करत असताना त्याचा आईबरोबर वाद झाला. दारुच्या नशेत असलेल्या संदीपने रागाच्या भरात आईच्या डोक्यात कुदळ मारली. रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आईनंतर त्याने वडिलांनाही मारहाण केली. बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी मालुबाईंना रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वडील श्रीपती मुसळे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मालुबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

 याप्रकरणी संशयित संदीप याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून या घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.  नवरा दारुचा व्यसनी गेल्यानंतर मालुबाई यांनी स्वतःच्या हिमतीवर गाय-म्हैशीचे पालन करुन दुधाच्या पैशावर आणि रोजंदारीवर संसार थाटला होता. म्हातारपणाची काठी असलेल्या मुलगा सुखात ठेवेल, या आशेवर असलेल्या मालुबाईचा शेवटी मुलानेच घात केला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news