डाळींचा तोरा वाढला ! दरात वाढ | पुढारी

डाळींचा तोरा वाढला ! दरात वाढ

सुभाष किवडे

पुणे : पावसाने ओढ दिल्याने सणासुदीच्या तोंडावर डाळींच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली. आवक कमी असल्यामुळे डाळींच्या भावात गत आठवड्यात क्विंटलमागे 500 ते 1000 रुपयांनी वाढ झाली. यामध्ये तूरडाळ व मसूरडाळीत सर्वाधिक क्विंटलमागे 1 हजार रुपयांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले. तर, अन्य डाळींच्या दरात क्विंटलमागे 300 रुपयांनी वाढ झाली आहे. हिरवा आणि पांढरा वाटाणा, हरभरा तसेच हुलग्याचे दरही कडाडले आहेत. मात्र, मागणीअभावी खाद्यतलांचे दर स्थिर आहेत, तर साखरेला मागणी वाझल्याने क्विंटलमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली.

जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ रोखण्याकरिता केंद्र सरकारने पन्नास लाख टन गहू आणि पंचवीस लाख टन तांदळाची खुल्या बाजारात विक्री करण्याचे घोषित केले आहे. या घोषणेचा तूर्ततरी गहू अणि तांदळाच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, आगामी काळात प्रत्यक्ष माल बाजारात आल्यानंतर याचा परिणाम दिसून येईल, असा अंदाज आहे. राज्याच्या बर्‍याच भागात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. खरिपातील पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सणासुदीचा मोसम तोंडावर आला, तरी अद्यापही घाऊक बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढलेली नाही. यामुळे खाद्यतेलांस मागणी कमी असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून दरात फारसा बदल आढळला नाही. मागणी वाढल्यामुळे साखरेच्या दरात क्विंटलमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली. मात्र, आवक कमी असून, मागणी वाढल्यामुळे सर्व प्रकारच्या गुळाच्या दरात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाली. सणासुदीचा मोसम तोंडावर आला, तरीही खाद्यतेलांस उठाव कमीच आहे. आवक-जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यातही शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांचे दर स्थिर होते.

डाळी-कडधान्यांच्या दरात मोठी वाढ
गेले अनेक दिवस स्थिर असलेले हरभराडाळीचे दर ऐन सणासुदीच्या तोंडावरच मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नाफेडकडून हरभराडाळीची चढ्या दराने विक्री सुरू झाल्यामुळे आणि आवक कमी प्रमाणात होत असल्याने गेल्या आठवडाभरातच हरभराडाळीच्या दरात क्विंटलमागे 300 ते 400 रुपयांनी वाढ झाली. यामुळे भाजक्या डाळ्यांच्या दरात 40 किलोच्या पोत्यामागे तीनशे रुपयांनी तर बेसनदरात 50 किलोमागे 200 रुपयांनी वाढ झाली. हरभर्‍याचे दरही 300 रुपयांनी वधारले. तूरडाळीची दरवाढ सुरूच असून, गेल्या आठवड्यातही दरात 1000 रुपयांनी वाढ होऊन दराने दीडशे रुपयांची पातळी गाठली आहे. तुटवड्यामुळे हिरव्या आणि पांढर्‍या वाटाण्याचे दर आणखी 300 ते 400 रुपयांनी वाढले. हुलग्याच्या दरात आणखी 500 रुपयांनी वाढ झाली आणि दराने 1000 ते 10500 रुपये प्रतिक्विंटल या उच्चांकी पातळीवर पोहचला. मिलबर गव्हाचे दर वाढल्यामुळे तसेच मागणी चांगली असल्याने रवा आणि मैद्याच्या दरात 50 किलोमागे आणखी 25 ते 30 रुपयांनी वाढ झाली. तर आवक-जावक साधारण असल्यामुळे गहू, बाजरी तसेच सर्व प्रकारच्या तांदळाचे दर स्थिर होते.

पोह्यांची पुन्हा भाववाढ
भाताच्या भाववाढीमुळे पोह्यांची दरवाढ सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही सर्व प्रकारच्या पोह्यांचे दर क्विंटलमागे आणखी सुमारे दोनशे रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले. मुरमुरा, भडंग, भाजक्या पोह्याचे दरही पोत्यामागे पंचवीस ते तीस रुपयांनी वाढले.
आवक कमी असल्यामुळे शेंगदाण्याची दरवाढ कायम आहे. उत्तर प्रदेशातून मेणपुरी शेंगदाण्याची आवक सुरू झाली असून, प्रतिक्विंटलचा दर 11200 रुपये आहे. सध्या हाच शेंगदाणा सर्वांत स्वस्त आहे. साबूदाणा, भगर, गोटा खोबरे तसेच नारळाच्या दरात कोणतीही वध-घट आढळली नाही.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3850 ते 3900 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2700-2800, रिफाइंड तेल ः 2550-3250, सरकी तेल 1510-1800, सोयाबीन तेल 1500-1700, पामतेल 1400-1600, सूर्यफूल रिफाइंड तेल 1500-1700, वनस्पती तूप 1520-1900, खोबरेल तेल 2150-2200.
तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3500, सोनामसुरी 4000-4500, एच. एम. टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-500, 1121-10000-11000, आंबेमोहर (सुवासिक) 8000-8500, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509- 8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु.

गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1. 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2. 3400-3600, एम. पी. लोकवन नं. 1. 3600-3800, नं. 2 3400-3600, सिहोर 4800-5800, सिहोरी 3400-3800, मिलबर 2750 रु.

ज्वारी : गावरान नं. 1. 5500-6000, गावरान नं. 2. 5000-5400, नं. 3. 4500-4800, दुरी 3800-4200 रु. बाजरी : महिको 3200-3500, गावरान 3000-3200, हायब्रीड 2800-3000 रु. गूळ : गूळ एक्स्ट्रा 4250-4450, गूळ नं. 1. 4050-4175, गूळ नं. 2. 3925-4025, गूळ नं. 3. 3800-3875, बॉक्स पॅकिंग 4000-5000 रु.

डाळी : तूरडाळ 14000-16000, हरभराडाळ 7200-7500, मूगडाळ 10200-10500, मसूरडाळ 8000- 8200, मटकीडाळ 10000-00, उडीदडाळ 10000-12000 रु.
कडधान्ये : हरभरा 6800-7000, हुलगा-11000 चवळी 7000-14000, मसूर 6500-6800, मूग 9500-10000, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 8000-8500, मटकी गुजरात 8000- 8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 12000-13000, वाटाणा हिरवा 9000-10000, वाटाणा पांढरा : 6500-7000, काबुली चणा 13000-18000 रु. साबूदाणा : साबूदाणा नं.1 8000, साबूदाणा नं.2 7500, साबूदाणा नं. 3 7200 रु. वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1100-1200 रु.

शेंगदाणा : जाडा 13000-13500, स्पॅनिश – 13000 घुंगरु 12000-12500, मेणपूरी 112000 रु. धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल : 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे : मध्य प्रदेश 4400-4800, पेण 3900-4200, मध्यम पोहा-4200-4500, दगडी पोहा 4200- 4900, पातळ पोहा 5000-5600, सुपर पोहा 4800-5300, भाजका पोहा 575-625, मका पोहा 575-625, भाजके डाळे 3200-3650, मुरमुरा राजनांदगाव (9 किलोस) 525, भडंग 850-900, घोटी 550, सुरती 560-580 रु. रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1600-1650, रवा 1650-1700, मैदा 1650-1700, बेसन : (50 किलोस) 3800-4100 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 250, मीठ दळलेले (50 किलोस) 270 रु. मिरची : काश्मिरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 5000-5500, लवंगी तेजा 25000-26000, गुंटूर 24000-25000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु.

नारळ : (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग 1150-1250, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1400- 1450, सापसोल 2000-2500 रु.

Back to top button