अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या दुसर्‍या विशेष फेरीसाठी 7 हजार 125 विद्यार्थी | पुढारी

अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या दुसर्‍या विशेष फेरीसाठी 7 हजार 125 विद्यार्थी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत रिक्त जागांसाठी प्रवेशाची दुसरी विशेष फेरी राबविण्यात येत आहे. या फेरीसाठी 7 हजार 125 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. तीन नियमित फेर्‍या व एक विशेष फेरीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. अद्याप अकरावीच्या 40 हजार 955 जागा रिक्त आहेत. यासाठी दुसरी विशेष फेरी घेण्यात येत आहे.

या फेरीसाठी 8 हजार 605 विद्यार्थी पात्र ठरले असून, 7 हजार 125 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीक्रमानुसार 5 हजार 112 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. या फेरीसाठी खुल्या प्रवर्गातील 5 हजार 300 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अकरावीसाठी 1 लाख 16 लाख 390 इतकी प्रवेशक्षमता असून, आतापर्यंत 67 हजार 901 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर, 48 हजार 489 जागा रिक्त आहेत.

हेही वाचा

सांगली : कुपोषित बालकांची संख्या निम्म्याने घटली

समाजकल्याण निधीचा गैरव्यवहार; चौकशी सुरू

भुदरगड तालुक्यात लम्पी रोगाचा धुमाकूळ!

 

Back to top button