पुणे शहरातील पाणीपुरवठ्याच्या सतराशे तक्रारी | पुढारी

पुणे शहरातील पाणीपुरवठ्याच्या सतराशे तक्रारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाणीपुरवठ्याबाबत तक्रारींची संख्या वाढतच असून, महापालिकेकडे 1 हजार 756 तक्रारी आल्या आहेत. दरम्यान, 1 हजार 200 तक्रारी सोडविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उशिरा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येेत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्टपर्यंत पुरेल, असे नियोजन करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेला दिले आहे. त्यामुळे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाची अंमलबजावणी मागील काही आठवड्यापासून सुरू आहे.

यामुळे पाणी नियमित न मिळणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, विकास कामांमुळे जलवाहिन्यांची तोडफोड होण्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे पाणी पोहोचण्यात अडथळे येतात. परिणामी, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त नागरिकांवर अनेकदा थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापर्यंतची वेळ येते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाण्याबाबतीत तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनवर आतापर्यंत महापालिकेकडे 1 हजार 756 तक्रारी आल्या आहेत. त्यातील सुमारे 1 हजार 200 तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

House Prices Rose : मुंबई वगळता देशातील महानगरांत घरांच्या किमती भडकल्या!

Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या जुहू येथील बंगल्यात चोरी

Back to top button