लवकरच बेमुदत ‘जेजुरी बंद’; ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय | पुढारी

लवकरच बेमुदत ‘जेजुरी बंद’; ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने व धर्मादाय आयुक्त कार्यालयाने विश्वस्त निवडीबाबत ठोस निर्णय न घेतल्यास बेमुदत जेजुरी बंद करण्याचा निर्णय शनिवारी (दि. 3) झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी आंदोलनस्थळी ग्रामस्थांची बैठक झाली.

या वेळी आंदोलक आणि ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, संदीप जगताप, सुधीर गोडसे, अजिंक्य देशमुख, सचिन पेशवे, हेमंत सोनवणे, जयदीप बारभाई, माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष रमेश गावडे, व्यापारी संघाचे अध्यक्ष रवींद्र खुडे, राजेंद्र पेशवे, राहुल घाडगे, अनिकेत हरपळे, रवींद्र जोशी, सचिन खोमणे, सोमनाथ उबाळे, सुशील राऊत, छबन कुदळे, शहरील दुकानदार, व्यापारी, विक्रेते, पुजारी, सेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलकांनी गेले नऊ दिवस विविध मार्गांनी आंदोलन केले. विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार संजय जगताप तसेच तालुक्यातील सर्व पक्षांनी या आंदोलनाची दखल घेतली. मात्र, शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. आंदोलकांनी कायदेशीर लढाईचे काम हाती घेतले आहे. पुढील काळात ग्रामस्थांना विश्वासात घेऊन बंदचा निर्णय घेतला जाईल, असे संदीप जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा

धुळे लोकसभा ठरणार अंतर्गत कलहाचे कारण

चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात सुविधांचा बोजवारा

बेळगाव : तिनईघाट कार अपघातात सावर्डेचे भाविक जखमी

Back to top button