बेळगाव : तिनईघाट कार अपघातात सावर्डेचे भाविक जखमी | पुढारी

बेळगाव : तिनईघाट कार अपघातात सावर्डेचे भाविक जखमी

रामनगर : पुढारी वृत्तसेवा तामिळनाडू येथील वैलनकीनी येथून देवीदर्शन घेऊन घरी गोवा-सावर्डे येथे परत जात असताना तिनईघाटजवळ महामार्गवर कारचा टायर फुटल्याने ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे तीन पलट्या मारत कार 10 फूट चरीत कोसळली. या अपघातात दोघे जखमी झाले असून, एकाची स्थिती गंभीर आहे.

हा अपघात आज (रविवार) सकाळी 8.55 वाजता घडला असून, या कारमध्ये ड्रायव्हर मिळून सहाजण होते. यातील डिसोझा, (वय 34) गंभीर जखमी झाले आहेत. पिटर डिसोझा (61) यांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. रोजामारी डिसोझा (60) यांना मुका मार लागला आहे. नॅलिस डिसोझा (3) आणि विवेल फर्नांडिस हे दोघे सहीसलामत असल्याचे दिसून आले. कार ड्रायव्हर पांडुरंग फडते (35) सुखरूप आहेत. अपघातानंतर तिनईघाट नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले. जखमींवर रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर काम सुरू आहे. तसेच या मार्गावर मल्टीएक्सेल वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. यामुळे छोट्या वाहनांना याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहनात बिघाड झाल्यास वाहनाला लावलेले दगड, फांद्या वाहनधारकांकडून बाजूला टाकून दिल्‍या जात नाहीत. यामुळेही अपघात घडत आहेत. या महामार्गावरून वाहने समान गतीने धावत नसून, वाहनाला हेलकावे बसत असल्याच्या तक्रारी आहेत. हा महामार्ग चारचाकी वाहनांना धोकादायक, असून, या एका महिन्यात कित्येक चारचाकी वाहनांना अपघात झाले आहेत. पिटर डिसोझा, पियेदाद डिसोझा , रोजामारी डिसोझा, नॅलीस डिसोझा, विवेल फर्नााडिस, पांडू फडते असे एकूण 6 जण कारमध्ये होते.

हेही वाचा : 

Back to top button