पुणे: कोरेगाव भीमा येथे भीमा नदीत दोन मुले बुडाली | पुढारी

पुणे: कोरेगाव भीमा येथे भीमा नदीत दोन मुले बुडाली

कोरेगाव भीमा: पुढारी वृत्तसेवा: भीमा नदीत आज (दि.२१) दुपारी दीडच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेली दोन मुले पाण्यात बुडाली. ही मुले कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील ढेरंगे वस्तीतील असून गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६), अनुराग विजय मांदळे (वय १६) अशी त्यांची नावे आहेत.

वस्तीवरील पाच ते सात मुले पोहण्यास गेली असता त्यातील ही दोन मुले पाण्यामध्ये अचानक दिसेनासे झाल्याने बाकी मुलांनी गावात जाऊन ग्रामस्थांना कळविले. तेव्हा गावातील सोन्या भोकरे, संपत भांडवलकर, बापू भांडवलकर, भाऊ अजगर, तानाजी ढेरंगे आदी ग्रामस्थांनी पाण्यात उतरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नाही.

घटनेची माहीती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस अंमलदार अमोल रासकर, मंगेश लांडगे आदी तर अग्निशमन दलाचे जवान व रुग्णवाहिका दाखल झाल्या. दुपारी चारपासून अग्निशमन दलाचे जवान पाण्यात मुलांचा शोध घेण्यास उतरले असून शोध अजून चालू आहे. बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button