पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नवा जिल्हा करा : आ. लांडगे | पुढारी

पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नवा जिल्हा करा : आ. लांडगे

पिंपरी(पुणे) : पुणे जिल्ह्याचा विस्तार वाढत आहे. सर्व प्रशासकीय कामांसाठी पुण्याकडे जावे लागते. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे आणि शिवनेरी नावाने नवा जिल्हा करावा व पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र्य तालुका म्हणून निर्मिती करावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपरीतील कार्यक्रमात बोलताना आ. लांडगे म्हणाले, स्वतंत्र पोलीस आयुक्तायला मान्यता मिळाली.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्माण झाले. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहर विस्तारत आहे. तसेच पुणे जिल्ह्याचाही विस्तार वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे. सर्व प्रशासकीय कामांसाठी पुण्याकडे जावे लागते. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करावे आणि शिवनेरी हा नवा जिल्हा करावा व पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र्य तालुका म्हणून निर्मिती करावी.

Back to top button