कर्नाटक निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता येईल : बावनकुळे | पुढारी

कर्नाटक निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता येईल : बावनकुळे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटक निवडणुकीत भाजपचा विजय नक्की होईल. तेथे पक्षाची एकहाती सत्ता येईल. भाजपच्या विजयाने विरोधक हतबल होतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी (दि. 7) व्यक्त केला. प्राधिकरण येथे जिल्हा भाजपकडून बुथ आणि पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. पिंपरी- चिंचवड शहरासह राज्यातील 75 जिल्ह्याध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे देखील त्यांनी या प्रसंगी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पिंपरी- चिंचवडमध्ये जिल्हा भाजपकडून बूथ आणि शक्ती प्रमुख केंद्र तसेच पदाधिकारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत 1 लाख 80 हजार घरांना भेट देण्याची योजना तयार केली आहे. प्रत्येक विधानसभेत 60 हजार घरांना भेट देणार आहोत. 20 मे पर्यंत हे काम प्रवास पूर्ण होणार आहे. पुन्हा एकदा ’घर चलो अभियान’ आम्ही पूर्ण करणार आहोत. प्रत्येक बूथवर 25 पक्ष प्रवेश होतील, अशी योजना आखली आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपचा निश्चित विजय होईल,असे स्पष्ट करुन बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमध्ये बहुमताने आमचे सरकार येईल.

राज्यातील 75 जिल्ह्याध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरु

पिंपरी- चिंचवडसह राज्यातील 75 जिल्ह्याध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक जात आहेत. पदाधिकार्यांशी चर्चा करुन प्रदेशाला त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर जिल्हाध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे.

Back to top button