लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथील 8 टपर्‍यांवर कारवाई | पुढारी

लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथील 8 टपर्‍यांवर कारवाई

लोणावळा : टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट याठिकाणी वेळेचे निर्बंध न पाळता रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीररित्या व्यवसाय करणार्‍या 8 टपरी चालकांविरुद्ध लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे.

लोणावळ्यात बेकायदेशीर धंद्यांवर कारवाईचे सत्र
सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. सध्या लोणावळा परिसरात विनापरवाना सुरू असलेले धंदे तसेच व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार आतवण (ता. मावळ) गावचे हद्दीमध्ये असणार्‍या टायगर पॉईंट या पर्यटनस्थळावर रविवारी (दि. 23) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वेळेचे निर्बंध न पाळता विनापरवाना 8 टपरी व्यावसायिक आपला व्यवसाय करताना पोलिसांना आढळून आले. या सर्वांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली आहे. सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकातील हवालदार सुभाष शिंदे, लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश माने, केतन तळपे, मच्छिंद्र पानसरे, प्रणयकुमार उकिर्डे यांनी केली आहे.

व्यावसायिकांनी वेळेचे निर्बंध पाळून आपला व्यवसासय करावा. पर्यटनाकरिता आलेल्या पर्यटकांनी रात्री 7 ते सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान टायगर पॉईंट येथे फिरण्याकरिता जाऊ नये.
                              -सत्यसाई कार्तिक, सहायक पोलिस अधीक्षक

Back to top button