बाप-लेकीच्या नात्याला कलंक ! पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार | पुढारी

बाप-लेकीच्या नात्याला कलंक ! पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडितेला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर ती गर्भवती असल्याचा प्रकार समोर आला आणि हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी पित्याला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हा प्रकार जून 2022 ते 4 मार्च 2023 दरम्यान पुणे आणि लातूर या ठिकाणी घडला. दरम्यान कोंढव्यात राहणार्‍या तरुणाने जानेवारी 2022 मध्ये पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबाबत आता कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गणेश हिंगे (30) याच्यावर गुन्हा दाखल केला

Back to top button