पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला वेतनातील फरक | पुढारी

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला वेतनातील फरक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील सेवानिवृत अधिकारी आणि कर्मचारी यांना शासनाच्या निर्णयानुसार सातव्या आयोगातील फरकाची रक्कम अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर अखेर मिळाली. यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीने विशेष पुढाकार घेतला होता.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील विविध विभातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील जानेवारी 2016 ते नोव्हेबर 2019 या कार्यकाळातील फरकाची रक्क्म मिळावी यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीच्यावतीने संरक्षण विभाग (दिल्ली), पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, दक्षिण कमांड, या संस्थाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. तसेच बेमुदत उपोषण करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला होता. याची दखल पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी सुब्रतो पाल यांनी दखल घेतली. यांनी देखील केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत रक्कमेतील अनुदान मार्च अखेरीस सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले. या कर्मचाऱ्यांना फरकापोटी 5 कोटी 46 लाख कोटी जमा करण्यात आले. तर 20 टक्के रक्कम म्हणजेच 3 कोटी 39 लाख कपात करण्यात आलेली रक्क्म लेखा परिक्षण झाल्यानंतर देण्यात येणार आहे. तसेच सेवेतील कर्मचाऱ्यांनाही 11 महिन्यांच्या फरकापोटी 8 कोटी 32 लाख रूपये अदा करण्यात येणार आहेत.
कृती समितीच्यावतीने आशा बागलाने, किशोर संघेलिया, त्रिंबक बारवकर, विक्रम गोहेर, पी.एम. ठोकळे, धनंजय केदारी यांनी प्रयत्न केले.

Back to top button