पिंपरीत ‘एच 3 एन 2’ चे 19 रुग्ण बरे | पुढारी

पिंपरीत ‘एच 3 एन 2’ चे 19 रुग्ण बरे

पिंपरी : शहरामध्ये आत्तापर्यंत इन्फ्ल्युएन्झा एच 3 एन 2 चे 19 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या एकाही रुग्ण दाखल नाही. शहरामध्ये आत्तापर्यंत एच 3 एन 2 चे एकूण 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 4 हे शहर हद्दीबाहेरील आहेत. उपचारादरम्यान एच 3 एन 2 या आजाराबरोबरच अन्य आजार असणार्‍या दोघांचा यापूर्वीच मृत्यू झालेला आहे.

खासगी रुग्णालयांकडून महापालिकेला एच 3 एन 2 रुग्णांची माहिती उशिरा कळविण्यात येत आहे. त्यामुळे रुग्ण बरे झाल्यानंतर महापालिका वैद्यकीय विभागाच्या हातात माहिती येत आहे. एच 3 एन 2 ची रुग्णसंख्या सध्या शहरामध्ये नियंत्रणात आहे. सर्दी, खोकला, ताप, घसादुखी लक्षणे असल्यास त्वरित नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

Back to top button