खाद्यतेल उतरले; डाळींची दरवाढ सुरूच | पुढारी

खाद्यतेल उतरले; डाळींची दरवाढ सुरूच

सुभाष किवडे :

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे येथील घाऊक बाजारात खाद्यतेलांच्या दरात आणखी घसरण झाली. मात्र तुरडाळ, हरभराडाळीचे दर आणखी वाढले. ऊसाच्या तुटवडयामुळे गुळाचे दर 100 रुपयांनी वाढले. मिरचीची दरवाढ कायम आहे. मात्र आवक जावक साधारण असल्यामुळे साखर, गूळ, गहू, ज्वारी बाजरी, तांदळाचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. यंदा तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे तुरडाळीचे दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवडयातही दरात क्विंटलमागे आणखी 200 रुपयांनी वाढ झाली. मागणी वाढल्याने हरभराडाळीचे दरही 100 रुपयांनी वधारले.

मात्र आवक जावक साधारण असल्यामुळे मुगडाळ, मसुरडाळ तसेच उडीदडाळीचे दर स्थिर होते. मटकी, मूग, वाटाणा तसेच इतर कडधान्यांच्या दरातही फारसा बदल आढळला नाही. हरभराडाळीच्या दरवाढीमुळे बेसन दरात 50 किलोमागे 50 रुपयांनी वाढ झाली.
महाराष्ट्रातील नंदूरबार, दोंडाईचा तसेच मध्यप्रदेश आणि गुजरातच्या सौराष्ट्र भागातील नव्या गव्हाची मुबलक प्रमाणात आवक होत आहे. दररोज सुमारे पंधरा ट्रक गव्हाची आवक होत असून मागणीही चांगली असल्याने आता दर स्थिरावले आहेत. नव्या गावरान ज्वारीची आवकही समाधानकारक असून दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. आवक जावक साधारण असल्यामुळे सर्व प्रकारच्या तांदळाचे दर टिकून होते.

खाद्यतेले आणखी उतरली
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन, पामोलिन तसेच सुर्यफूल तेलाचे दर मोठया प्रमाणात उतरत आहेत. गेल्या आठवडयाभरातच दरात टनामागे सुमारे 40 ते 50 डॉलर्संची घट झाली. परिणामी, येथील घाऊक बाजारात शेंगदाणा तेल वगळता अन्य सर्वच खाद्यतेला्च्या दरात 15 किलो/लिटरच्या डब्यामागे 25 ते 50 रुपयांनी घट झाली.वनसप्ती तुपाचे दरही 25 रुपयांनी कमी झाले. मात्र तुटवडयामुळे शेंगदाणा तेलाचे दर डब्यमागे 25 रुपयांनी वाढले. खोबरेल तेलाचे दर स्थिर होते.आवक मुबलक प्रमाणात होत असल्यामुळे मागणी वाढली तरी साखरेचे दर गेल्या महिन्याभरापासून स्थिर आहेत.

गेल्या आठवडयातही दरात कोणताही बदल आढळला नाही. मुळातच यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाले, त्यातच अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरचीच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. यामुळे मिरचीच्या दरवाढीस पुन्हा चालना मिळाली असून दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे

: साखर (प्रतिक्विंटल) : 3475-3500 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2800-2875, रिफाईंड तेलः 2600-3400, सरकी तेल 1550-1850, सोयाबीन तेल 155-1850, पामतेल 1450-1650, सूर्यफूल रिफाईंड तेल 1675-1925, वस्पती तूप 1450-1925, खोबरेल तेल 2250 रु.
तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसूरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509- 8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु. गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5500, सिहोरी 3400-3800, मिलबर 2350-2450 रु. ज्वारी : गावरान नं. 1- 5000-5500, गावरान नं. 2-4600-4900, नं. 3 4200-4500, दूरी 3500-3900 रु. बाजरी : महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु. गूळ : गूळ एकस्ट्रा 3850-4000, गूळ नं. 1 3650-3800, गूळ नं. 2 3550-3600, गूळ नं.3 330-3450, गूळ नं. 4 3150-3250, बॉक्स पॅकिंग 3500-4800 रु. डाळी : तूरडाळ 10800-12000, हरभराडाळ 6200-6300, मूगडाळ 10200-10500, मसूरडाळ 7400-7500, मटकीडाळ 9800-10500, उडीदडाळ 9000-10500 रु. कडधान्ये : हरभरा 5400-5500, हुलगा- 7100-7200 चवळी 7000-9000, मसूर 6600-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000- 8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11100-11500, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा : 5500-6000, काबुली चणा 9000-15000 रु. साबुदाणा : साबुदाणा नं.1 6500, साबुदाणा नं.2 6200, साबुदाणा नं. 3 6000 रु. वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1200-1400 रु. शेंगदाणा : जाडा 12000-12500, स्पॅनिश – 11600-11800, घुंगरु 10700-10800, टीजे 10500 रु. धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल : 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे : मध्य प्रदेश 4000-4400, पेण 4000-4300, मध्यम पोहा-3800-4300, दगडी पोहा 3800-4400, पातळ पोहा 4400-5200, सुपर पोहा 4400-4700, भाजका पोहा 600-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2800-3200, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 650-775, घोटी 450- 475, सुरती 475-500 रु. रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1525-1625, रवा 1525-1625, मैदा 1525-1625, बेसन : (50 किलोस) 3350-3650 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 260, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 57500-60000, लवंगी तेजा 24000-25000,गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु. नारळ : (शेकडयाचा भाव): नवा नारळ पॅकिंग 1350-1400, मद्रास 2500-2600. पालकोल जुना 1500-1550, सापसोल 2000-2700 रु.

Back to top button