राज्यात एच3 एन2 चे 264 रुग्ण | पुढारी

राज्यात एच3 एन2 चे 264 रुग्ण

 प्रज्ञा केळकर-सिंग : 

पुणे : राज्यात सध्या कोरोनासह एच3एन2 च्या संसर्गात वाढ होताना दिसत आहे. 1 जानेवारी ते 22 मार्च या कालावधीत राज्यात 3 लाख 19 हजार 224 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1799 रुग्णांना ऑसेलटॅमीवीर औषध देण्यात आले आहे. यापैकी एच3एन2चे 264 बाधित रुग्ण असून, त्यापैकी 161 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

एन्फ्लूएन्झामुळे रुग्णाचा मृत्यू
राज्यात एच1एन1 चे 425 बाधित रुग्ण असून,’एच1एन1’च्या आणि ’एच3एन2’ची बाधा झालेल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त 3 संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी एक मृत्यू वाशीम, एक खडकी कॅन्टोन्मेंट आणि एक पुणे मनपा येथील आहे. मृत्यू परीक्षणानंतर मृत्यूच्या कारणांची मीमांसा
केली जाणार आहे.

काय आहे एच3एन2?
इन्फ्लूएन्झा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे.
इन्फ्लूएन्झा टाईप ’ए’चे एच1एन1, एच2एन2, एच3एन2 हे उपप्रकार आहेत.
ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया ही लक्षणे आहेत.
मास्क वापरणे, आजार अंगावर न काढणे, औषधोपचार घेणे, वारंवार हात धुणे अशी काळजी घ्यायला हवी.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
नियमित रुग्ण सर्वेक्षण
फ्लूसदृश रुग्णांवर विनाविलंब उपचार
शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय
रुग्णालयात विलगीकरण कक्ष
औषधोपचार आणि साधनसामग्रीचा साठा उपलब्ध
राज्यस्तरावर क्लिनिकल मॅनेजमेंटबाबत पुन:प्रशिक्षण
सर्व जिल्ह्यांना सर्वेक्षण, प्रतिबंध उपचारांबाबत
मार्गदर्शक लेखी सूचना
डेथ ऑडिट करण्याच्या सूचना

Back to top button