पुणे: चायनीज पदार्थ विक्रेत्यावर वार, आरोपीला अटक | पुढारी

पुणे: चायनीज पदार्थ विक्रेत्यावर वार, आरोपीला अटक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: चायनीज पदार्थ विक्री व्यावसायासाठी घेतलेले 15 हजार रुपये परत देऊनही आरोपीने एकावर धारदार शस्त्राने वार केला. या प्रकरणी संबंधित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. ही घटना 7 मार्चला कोथरुडमधील डीपी रस्त्यावर घडली. ओंकार अरविंद सोनकांबळे (व. शास्त्रीनगर, कोथरुड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. किरण कांबळे (वय 26 रा. सुतारदरा) असे जखमीचे नाव आहे. त्याने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी किरण आणि ओंकार मित्र असून व्यावसायासाठी किरणने त्याच्याकडून डिसेंबरमध्ये 15 हजार रुपये घेतले होते. जानेवारीमध्ये किरणने रक्कम ओंकारला परत दिली. मात्र, तरीही त्याने उर्वरित पैसे कधी देणार असे म्हणत किरणच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तानाजी पांढरे तपास करीत आहेत.

Back to top button