पुण्यात कार चालकाकडून पीएमपीएल चालकाला मारहाण | पुढारी

पुण्यात कार चालकाकडून पीएमपीएल चालकाला मारहाण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपीएल बसला मागून धडक दिल्यानंतर कारमधून उतरत पीएमपीएलच्या चालकाला कॉलर धरून खाली ओढत मारहाण करणार्‍या कार चालकावर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुंढवा चौकाजवळील बॉश कार सर्व्हिस सेंटर समोरील रस्त्यावर घडला.

या प्रकरणी पीएमपीएल चालकाच्या फिर्यादीवरून कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 मार्चला सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास मुंढवा रोडने वाघोली येथे बस घेऊन जात असताना हा प्रकार घडला.

Back to top button