पुणे : वारजे माळवाडी भागात बिबट्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

पुणे : वारजे माळवाडी भागात बिबट्या ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरातील वारजे माळवाडी भागात बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवसांपूर्वी, पुण्यात कोंढवे धावडे येथील एका सोसायटीच्या परिसरात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. पुणे शहराच्या जवळ पुन्हा बिबट्याचा वावर पाहायला मिळत आहे.

वारजे माळवाडी भागातील न्यू अहिरे गावातील एका नवीन बांधकाम इमारतीत बिबट्या शिरला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधिकारी व वन विभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आज सकाळी ८. वाजता पुण्यातील वारजे माळवाडी भागात असलेल्या जवळच असलेल्या न्यू अहिरे परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळाला. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम यांच्यासह वारजे पोलिस घटनास्थळी पोहचले.एका इमारतीच्या बाजूला असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये बिबट्या लपलेला होता. बिबट्याला पकडण्यासाठी एक मोठी जाळी टाकण्यात आली पण बिबट्याने तेथून पळ काढला. दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे

गेल्याच आठवड्यात कोंढवे धावडे येथील श्रीकृष्णनगरी सोसायटीच्या परिसरात बिबट्यासदृश प्राणी धावत आल्याचे सुरक्षारक्षक व पायी जाणाऱ्या एका नागरिकाच्या निदर्शनास आले. सोमवारी (दि. 13 ) पहाटे गेटवरील सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील हा प्राणी दिसून येत होता.

या सोसायटीलगत एनडीएचा परिसर व सीमा भिंत आहे. पहाटेच्या वेळी या सोसायटीच्या गेटमधून बिबट्यासदृश प्राणी सोसायटीच्या आवारात आला आणि दुसऱ्या दिशेला जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. याबाबत माजी सरपंच नितीन धावडे यांनी वन विभागास माहिती दिली. त्यानंतर वन विभाग बचाव पथकाने (रेस्क्यू टीम घटनास्थळी जाऊन पाहणी केली केली. संबंधित सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांनी हा प्राणी रानमांजर असल्याचे सांगितले. मात्र, नागरिकांनी तो बिबट्या असल्याचे सांगितले होते. हाच बिबट्या पुन्हा आला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Back to top button