उंडवडी : सावड पद्धतीने मुरघास निर्मिती | पुढारी

उंडवडी : सावड पद्धतीने मुरघास निर्मिती

उंडवडी(ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : जराडवाडी सह परिसरातील शेतकरी सावड पद्धतीने मुरघास करताना दिसत आहेत. मुरघास करण्यासाठी लागणारे मजूर, तसेच वेळ, पैसा याची यामुळे बचत होत आहे. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. जसजसा उन्हाळा वाढत जाईल तसा जिरायती भागात हिरवा चारा, तसेच सुका चारा कमी पडू लागतो.

जिरायती भागातील बहुतांश शेतकरी हा शेती व दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. जनावरांना चारा म्हणून मका, तसेच मका पिकांपासून बनवलेला मुरघास उपयोगी पडत असल्याने या भागातील शेतकरी मुरघास मोठ्या प्रमाणात तयार करतात. शिवाय, मुरघास करून ठेवला, तर जसा चारा कमी पडेल, तसा मुरघास चारा म्हणून हवा तेव्हा जनावरांना उपयोगी पडतो.

सध्या मक्याला गुंठ्याला बाराशे ते चौदाशे रुपये भाव आहे. शेतकरी एकत्र येत सावड पद्धतीने मुरघास करीत असल्याने वेळेसह पैशाची बचत होत आहे. मुरघास करण्यासाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागत नसल्याचे जराडवाडी येथील शेतकरी अमोल जराड यांनी सांगितले.

 

Back to top button