पुणे : उत्कृष्ट तपास अन नराधमाला फाशीची शिक्षेमुळे गौरव ; एसीपी नारायण शिरगावकर यांचा पोलिस महासंचालक यांच्या हस्ते गौरव | पुढारी

पुणे : उत्कृष्ट तपास अन नराधमाला फाशीची शिक्षेमुळे गौरव ; एसीपी नारायण शिरगावकर यांचा पोलिस महासंचालक यांच्या हस्ते गौरव

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  परभणी येथील गंगाखेड जिल्ह्यातील परभणी या ठिकाणी तत्कालीन पोलिस अधिकारी असताना पाच वर्षाच्या निर्भयावरील बलात्कार आणि खून प्रकरणाचा छडा लावत आरोपीला फाशीची शिक्षेपर्यंत पोहचवले. या गुन्ह्याची निवड केंद्रीय गृहमंत्री सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकासाठी करण्यात आली. त्याबद्दल सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांना पोलिस महासंचालक रजनिश सेठ यांच्या हस्ते गौरवण्यात आले. सध्या शिरगावकर यांच्यावर सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) पदाची जबाबदारी आहे.

परभणी येथील गंगाखेड येथील एका गावातील पाच वर्षाच्या मुलीवर एकाने बलात्कार करून तिचा खून करून तिचा मृतदेह विल्हवाट लावण्यासाठी विहरीत टाकून दिला होता. त्यावेळी कोपर्डी येथील घटनेची पार्श्वभूमी आणि घटनेची संवेदनशीलता तसेच जनतेचा आक्रोश यानंतर तपास एसीपी शिरगावकर यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी गुन्ह्याचा तपास करत एकही प्रत्यक्षदर्शी साथीदार नसताना भौतिक पुराव्यांच्या आधारे तपासाची साखळी पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले.

न्यायालयाने याप्रकरणात आरोपीला बलात्कार, खून, बाल लैंगिक अत्याचाराची विविध कलमे तसेच पुराव नष्ट करणे अशा विविध कलमानुसार फाशीची शिक्षा सुनावली. या सर्वोत्कृष्ट तपासाबद्दल शिरगावकर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते गौरविले. दरम्यान, मिळाले पदक हे सर्व वरिष्ठांचे मार्गदर्शन व पथकाच्या सहकार्याशिवाय शक्य नसल्याची भावना शिरगावकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केली.

Back to top button