पुणे : संवेदनशील मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षक देणार भेट | पुढारी

पुणे : संवेदनशील मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षक देणार भेट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक पोलिस निरीक्षक अश्विनी कुमार सिन्हा हे आज (गुरुवार, दि. 9) सकाळी 11.30 ते दुपारी 2 या वेळेत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील 5 संवेदनशील मतदार केंद्रांना भेट देणार आहेत. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 2 – अब्दुल करीम हुसैन अत्तार कोर्टवाले ऊर्दू पुणे म. न. पा. शाळा क्र. 8, तळमजला कसबा पेठ; मतदान केंद्र क्र. 5 – राजमाता जिजाबाई प्रा. शाळागृह, पुणे म. न. पा. शाळा क्र. 6, रुम क्र. 3, कसबा पेठ; मतदान केंद्र क्र. 10 – राजमाता जिजाबाई प्रा. शाळागृह, पुणे म. न. पा. शाळा क्र. 6, कसबा पेठ, रुम क्र. 6; मतदान केंद्र क्र.77 – सुंदराबाई राठी सेवासदन माध्यमिक प्रशाला तळमजला रुम क्र. 1, सदाशिव पेठ व मतदान केंद्र क्र. 94-गोपाळ हायस्कूल, तळमजला रुम क्र.1, 1347, सदाशिव पेठ या केंद्रांचा समावेश आहे.

मतदान केंद्रावरील मतदारांना निवडणूक निरीक्षक (पोलिस) यांच्यासोबत संवाद साधायचा असल्यास त्यांनी गुरुवारी या मतदान केंद्रांवर सकाळी 11.30 ते दुपारी 2 या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button