पिंपरी : शाळेच्या आवारात कचरा; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

पिंपरी : शाळेच्या आवारात कचरा; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

कामशेत : पुढारी वृत्तसेवा : दररोज येणार्‍या कचर्‍याच्या गाडीत कचरा न टाकता नागरिक शाळेच्या शेजारील रिकाम्या जागेत टाकत असल्याने परिसरात दुगर्र्ंधी पसरली आहे. परिणामी, विद्याथ्यार्र्ंचे आरोग्य धोक्यात आले आहे. कामशेत येथील जैन इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या पायर्‍याजवळ कचरा मोठ्या प्रमाणात आणून टाकला जातो. यामुळे शाळेच्या आवारात दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरते. या शाळेत नर्सरीपासून ते इयत्ता दहावीपर्यंत या शाळेत विद्यार्थी शिकत असतात. या दुर्गंधीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. पालकांनी ही बाब शाळेच्या निदर्शनास आणून दिली.

शिवाय कचर्‍याची गाडी दररोज गावातून फिरत असते. या कचर्‍याच्या गाडीत येथील स्थानिक रहिवासी कचरा टाकत नाहीत ते शाळेच्या जवळच कचरा टाकतात या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिका तनुश्री शर्मा यांनी याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात लेखी निवेदन दिले आहे. त्यात निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हा शाळेचा परिसर असून तो स्वच्छ व सुंदर असावा जेणेकरून मुलांना त्रास होणार नाही. शाळेचा परिसर हा पवित्र आहे. येथे कचरा टाकू नये, अशी विनंती करणारे निवेदन त्यांनी ग्रामपंचायतीला लेखी पत्राद्वारे दिले आहे. तरीही कचरा दररोज टाकण्यात येतो.

ग्रामपंचायतीची कचर्‍याची गाडी सकाळी गावातून फिरत असते. येथील स्थानिक रहिवासी या कचर्‍याच्या गाडीत कचरा टाकत नाहीत. यासाठी येथील रहिवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
                                – रूपेश गायकवाड, सरपंच, कामशेत ग्रामपंचायत

शाळेच्या आवारात कचरा टाकू नये. स्थानिक रहिवाशांनी जर कचरा गाडीत न टाकल्यास तर त्यांच्यावर शंभर टक्के दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
                          – विलास काळे, ग्रामविकास अधिकारी, कामशेत ग्रामपंचायत

 

Back to top button