खोर : भीमा पाटस कारखान्यात 1 लाख टन उसाचे गाळप | पुढारी

खोर : भीमा पाटस कारखान्यात 1 लाख टन उसाचे गाळप

खोर; पुढारी वृत्तसेवा : तब्बल तीन वर्षांनंतर सुरू झालेला दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आता पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करीत आहे. यंदाच्या हंगामात महिनाभरात कारखान्याने आजअखेर 1 लाख 790 टन उसाचे गाळप केले आहे. दौंडचे आमदार व भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी ही माहिती दिली. गळीत हंगामाबरोबरच सहवीजनिर्मिती प्रकल्पालादेखील चांगल्याप्रकारे उभारी मिळाली आहे.

कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने सभासद, कामगार, ऊसउत्पादक शेतकरी यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. कारखान्याने अवघ्या महिन्यातच 1 लाख टन उसाचे गाळप करून 86 हजार 950 क्विंटल साखर पोती उत्पादित केली आहेत. साखर उतारादेखील समाधानकारक आहे.

1 ते 7 जानेवारी पर्यंतचे ऊसउत्पादक शेतकरीवर्गाचे पेमेंटदेखील शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष कुल यांनी दिली. भीमा सहकारी साखर कारखान्याने ऊसउत्पादक शेतकरीवर्गाला बाजारभावदेखील चांगल्याप्रकारे देण्यात आला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा, असे आवाहन अध्यक्ष कुल यांनी केले आहे.

Back to top button