पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी रस्तेही सजले; पूर्वसंध्येला तरुणाईचा प्रचंड जल्लोष आणि उत्साह | पुढारी

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी रस्तेही सजले; पूर्वसंध्येला तरुणाईचा प्रचंड जल्लोष आणि उत्साह

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्युत रोषणाईने उजळलेले रस्ते…हातात लाल रंगांचे फुगे घेऊन जल्लोष करणारी तरुणाई…हॉटेलमध्ये मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टीचा आनंद घेणारे तरुण-तरुणी अन् ठिकठिकाणी लागलेले वेलकम 2023 चे फलक…असे जल्लोषी वातावरण सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला सायंकाळी आठपर्यंत पाहायला मिळाले. शनिवारचा दिवस असल्याने मित्र-मैत्रिणींबरोबर न्यू इअर पार्टीचा आनंद घेणार्‍या तरुणाईची गर्दी सकाळपासूनच हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये पाहायला मिळाली
सायंकाळी सहानंतर रस्ते विद्युत रोषणाईने झगमगले होते अन् सगळीकडे सेलिब्रेशन मूड पाहायला मिळाला.

यंदा ठिकठिकाणी सेलिब्रेशनचा रंग पाहायला मिळाला अन् सरत्या वर्षाला निरोप देत अनेकांनी नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत केले. शनिवारी संपूर्ण दिवस ठिकठिकाणी सेलिब्रेशनचा मूड होता. हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब हाऊस येथे गर्दी पाहायला मिळाली अन् स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत अनेकांनी नवीन वर्षाचा आनंद द्विगुणित केला. मॉलमध्येही विद्युत रोषणाई अन् वेलकम 2023 असे फलक लावले होते. सायंकाळी सातनंतर खर्‍या अर्थाने सेलिब्रेशन सुरू झाले. कॅम्पमधील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता अन् डेक्कन परिसरात हातात लाल रंगाचे फुगे घेऊन जल्लोष करणारी तरुणाई पाहायला मिळाली.

हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये न्यू इअर पार्टीचा रंग बहरला होता, तर रस्त्यांवरील गर्दीतही नवीन वर्षाचा आनंद दिसून आला. ठिकठिकाणी गाण्यांचा आवाज ऐकू येत होता, तर अनेकजण एकमेकांसोबत सेल्फी काढत होते. न्यू इअर पार्टीही काही हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये आयोजित केली होती. त्यातही तरुणाईने सहभाग घेतला.

31 डिसेंबर शनिवारी आल्याने तरुणाईने न्यू इअर पार्टीचा आनंद घेतला. तरुणाईची गर्दी सकाळपासूनच हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये पाहायला मिळाली, तर कॅम्प परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसर आदी ठिकाणीही अनेक जण सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले. सायंकाळी सहानंतर तर रस्ते विद्युत रोषणाईने झगमगले होते अन् सगळीकडे सेलिब्रेशन मूड पाहायला मिळाला.

रात्री नऊनंतर फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर तरुणाईने जमायला सुरुवात केली. नवनवीन फॅशनेबल कपडे, हातात गिफ्टस्, लालरंगी फुगे घेऊन हा रस्ता तरुणाईच्या गर्दीने फुलून गेला होता. जंगली महाराज रस्ता, महात्मा गांधी रस्ता आणि डेक्कन परिसरात प्रंचड पोलिस बंदोबस्तात तरुणाईने नववर्षाचे जोरदार स्वागत केले. हॅप्पी न्यू इअर 2023 चा जयघोष करत तरुणाईने रस्त्यावर सेलिब्रेशन केक कापला.

Back to top button