पिंपरी : आतापर्यंत 17 बालकांना गोवरची लागण | पुढारी

पिंपरी : आतापर्यंत 17 बालकांना गोवरची लागण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरात आतापर्यंत गोवरची एकूण 17 बालकांना लागण झाली आहे. त्यामध्ये गेल्या महिनाभरात आढळलेल्या 13 बाधित रुग्णांचा समावेश आहे. तर, 382 संशयित बालरुग्ण आढळले आहेत. गेल्या साडेअकरा महिन्यांतील ही परिस्थिती आहे.

थेरगावमध्ये 2 रुग्ण

नव्याने आढळलेल्या 13 बालरुग्णांमध्ये कुदळवाडीमधील 5, थेरगावमधील 2 रुग्णांचा समावेश आहे. त्याशिवाय, शहरातील मोशी व अन्य भागात 6 रुग्ण आढळले आहेत. शहरात 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत गोवरचे 389 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 17 रुग्णांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

3 हजार 94 बालकांना डोस

महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आत्तापर्यंत 2 लाख 38 हजार 509 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर, 8 लाख 48 हजार 389 इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. पाच वर्षांखालील 52 हजार 992 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. व्हिटॅमिन एची मात्रा 27 हजार 808 बालकांना देण्यात आली आहे. 3 हजार 94 बालकांना गोवर रुबेलाचा पाहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे.

Back to top button