कारवाईचे पाणी नेमके मुरतेय कुठे? बाणेर परिसरातील नागरिकांचा सवाल | पुढारी

कारवाईचे पाणी नेमके मुरतेय कुठे? बाणेर परिसरातील नागरिकांचा सवाल

बाणेर : बाणेर परिसरातील मुख्य रस्त्यावर केबल टाकण्यासाठी नुकतेच रात्रीच्या वेळी एका कंपनीने अनधिकृत खोदकाम केल्याचे समोर आले होते. ही खोदाई कोणत्या कंपनीने केली, याचा शोध घेण्यात महापालिका व पोलिस प्रशासनाला अद्यापही यश आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे खोदकाम करणारे मोकाट सुटणार की त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

मुख्य रस्त्यावर केबल टाकण्यासाठी सोमवारी (दि. 28) रात्री सुरू असलेले खोदकाम भाजप पदाधिकार्‍यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ते थांबविले. त्यानंतर हे खोदकाम करणार्‍या कामगारांसह ट्रॅक्टर व ब—ेकर या पदाधिकार्‍यांनी महापालिका अधिकारी व पोलिसांना ताब्यात दिले. परंतु, त्यावर लगेच कारवाई न करता विलंब केल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अनधिकृत खोदाई करून केबल टाकण्याबाबतचे वृत्त दैनिक ‘पुढारी’मध्ये गुरुवारी (दि. 1) प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर प्रशासकीय हालचाली वाढल्या असल्या, तरी अद्यापही प्रशासनास कंपनीच्या नावाचा शोध घेण्यात यश आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत महापालिकेने पोलिस प्रशासनाला पत्रव्यवहार केला असून, पोलिसांनी तपास करून संबंधित कंपनीचे नाव लवकरात लवकर कळवावे, असे म्हटले आहे. कंपनीचे नाव कळताच संबंधितांवर नियमानुसार तीनपट दंडात्मक वसुली केली जाणार असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. परंतु, प्रत्यक्षात अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याने नेमके पाणी कुठे मुरते आहे, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

त्या वेळी दिरंगाई का?
स्थानिक पदाधिकार्‍यांनी ज्या वेळेस ट्रॅक्टर व त्यासोबतचे कामगार महापालिका व पोलिस प्रशासनाच्या ताब्यात दिले होते, त्या वेळी कंपनीचे नाव विचारण्यात का आले नाही? किंवा त्या वेळी सांगण्यात आलेल्या कंपनीच्या नावाने कारवाई का केली जात नाही? हा प्रश्नही अद्याप गुलदस्तात आहे.

त्या वेळी दिरंगाई का?
स्थानिक पदाधिकार्‍यांनी ज्या वेळेस ट्रॅक्टर व त्यासोबतचे कामगार महापालिका व पोलिस प्रशासनाच्या ताब्यात दिले होते, त्या वेळी कंपनीचे नाव विचारण्यात का आले नाही? किंवा त्या वेळी सांगण्यात आलेल्या कंपनीच्या नावाने कारवाई का केली जात नाही? हा प्रश्नही अद्याप गुलदस्तात आहे.

Back to top button