पिंपरी : ब्रँडेडच्या नावाखाली बनावट कपड्यांची विक्री | पुढारी

पिंपरी : ब्रँडेडच्या नावाखाली बनावट कपड्यांची विक्री

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  ब्रँडेड कंपनीचा लोगो वापरून बनावट कपड्यांच्या विक्रीप्रकरणी पिंपरी कॅम्प येथील पाच दुकानदारांवर कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 1) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. राहुल सुरेश जयसिंगानी (29, रा. पिंपळे सौदागर), रोजेश टेकचंद जयसिंघानी (52, रा. काळेवाडी), दिलीप नेनूमल खतिजा (52, रा. पिंपरी कॅम्प), राजेश गुरुदासमल तेजवानी (52, रा. काळेवाडी), धीरज किशोर जयसिंघानी (31, रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दुकानदारांची नावे आहेत. याप्रकरणी दिलीपकुमार राधेशाम स्वर्णकार (39, रा. मुंबई) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुमा कंपनीत नोकरीला आहेत. दरम्यान, पिंपरी कॅम्प येथील काही दुकानांमध्ये पुमा कंपनीचा बनावट लोगो वापरून कपडे विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान, फिर्यादी यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी पिंपरी कॅम्पमधील येथील दुकानांतून 10 लाख 99 हजारांचे कपडे जप्त केले आहेत. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

 

Back to top button