कोथरूड : स्वच्छतागृहातील गैरसोय दूर करण्याची मागणी | पुढारी

कोथरूड : स्वच्छतागृहातील गैरसोय दूर करण्याची मागणी

कोथरूड : कर्वेनगर येथील शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यानात असलेल्या स्वच्छतागृहात अपुर्‍या सुविधांमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने ही कमतरता दूर करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. या उद्यानात चालण्यासाठी ट्रॅक, मुलांना खेळायला साधने उपलब्ध आहेत. तसेच स्वच्छतागृहदेखील उपलब्ध आहे.

मात्र, त्यात अत्याधुनिक सुविधा नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. या स्वच्छतागृहाची रचना जुन्या पद्धतीची असल्याने गुडघेदुखीचा त्रास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही. उद्यानात आल्यानंतर गरज भासल्यास प्रात:विधीसाठी पुन्हा घरी परत जावे लागत आहे. यामुळे या स्वच्छतागृहात कमोड टॉयलेट बसविण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी या निवेदनात नमूद केल्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेश पासलकर यांनी सांगितले.

Back to top button