पुणे : स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या चळवळीत ‘पुढारी’ अग्रेसर : डॉ. योगेश जाधव | पुढारी

पुणे : स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या चळवळीत ‘पुढारी’ अग्रेसर : डॉ. योगेश जाधव

पुणे : दै.‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव प्रास्ताविकाच्या भाषणात म्हणाले, ‘पुढारी’च्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ डॉ. के. एच. संचेती यांच्यासह कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांतील डॉक्टरांचा सन्मान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होत आहे. प्रकृती बरी नसतानाही त्यांनी बहुमूल्य वेळ दिला. स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या सामाजिक चळवळीत ‘पुढारी’चे योगदान आहे.

जगातील सर्वाधिक उंचीवर असणार्‍या सियाचिन भागात ‘पुढारी’ समूहाने रुग्णालय उभारले. यामध्ये आजपर्यंत पाच लाख जवानांनी उपचार घेतले. दरवर्षी या रुग्णालयाला काही ना काही आर्थिक मदत ‘पुढारी’च्या माध्यमातून दिली जाते. जागतिक दर्जाचे ब्लँकेट आपण त्यांना दिले. यंदा 25 लाख रुपये देऊन ब्लड बँक उभारण्यात आली आहे.

तसेच गुजरातमधील भूकंप झालेल्या भूज येथे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येत आहे. कोरोनामध्ये सरकारच्या खांद्याला खांदा लावून ‘पुढारी’ने काम केले. दिव्यांगांसाठी राज्यात सर्वव्यापी लसीकरण मोहीम हाती घेतली. कोल्हापूरसह पुण्यासाठी कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात येणार आहे. ‘पुढारी’ची वैद्यकीय क्षेत्रासोबतची ही बांधिलकी अशीच सुरू राहील, अशी ग्वाही डॉ. योगेश जाधव यांनी दिली.

Back to top button