पुणे : खड्डे बुजविण्यासाठी अनोखे आंदोलन; कॅन्टोन्मेंट भागातील नागरिकांचा पुढाकार | पुढारी

पुणे : खड्डे बुजविण्यासाठी अनोखे आंदोलन; कॅन्टोन्मेंट भागातील नागरिकांचा पुढाकार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे कॅन्टोन्मेंट भागातील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून, ते बुजविण्यासाठी बोर्ड प्रशासन निधी नसल्याचे सातत्याने सांगत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनात जाऊन अनोखे आंदोलन करीत लक्ष वेधले. खड्डे बुजवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यासाठी निवेदने देण्यात आली, तसेच फोन, व्हॉट्सअपद्वारे फोटो पाठवूनसुद्धा त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.

त्यामुळे काँग्रेसचे शहर सरचिटणीस संजय कवडे यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनापर्यंत वाजत गाजत रॅली काढण्यात आली. त्यानंतर खड्डे बुजविण्यासाठी मिठाई, उटणे, फटाके, मोती साबण, पूजेचे ताट, टॉवेल टोपी, दिवाळी भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. या वेळी कॅन्टोन्मेंटच्या अधिकार्‍यांनी खड्डे बुजविण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदत मागितली आहे.

Back to top button