पुणे : बँकेसह 40 जणांची साडेदहा कोटींची फसवूणक | पुढारी

पुणे : बँकेसह 40 जणांची साडेदहा कोटींची फसवूणक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सिंधुदुर्ग येथील कनकशिल्प नावाच्या बांधकाम प्रकल्पामध्ये फ्लॅट खरेदीसाठी 40 फ्लॅटधारकांची कर्ज प्रकरणे सादर केल्यानंतर कर्ज मंजूर होऊन तब्बल 8 कोटी 17 लाखांची रक्कम मिळूनही कोणत्याही प्रकारचे काम सुरू न करणार्‍या चौघांवर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात तब्बल 10 कोटी 35 लाख 94 हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी संतोष रामन्ना शेट्टी, रामेश्वर सांबारी, जसवनील सांबारी, भारत को-ऑपरेटिव्ह बँकेचे धनकवडी शाखेचे रवींद्र के कोटीयन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमनाथ पांडू पुजारी (50, रा. चैतन्यनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2015 ते जून 2022 दरम्यान घडला. आरोपींनी अकाउंटवर रक्कम जमा झालेली असतानासुद्धा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काम न करता बनावट डिमांड लेटर व आर्किटेक्ट सर्टिफिकेट घेऊन ते खरे असल्याचे भासवून ती रक्कम वापरून बँकेची 10 कोटी 35 लाख 94 हजारांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button