सेवा रस्त्यावर खड्डेच खड्डे; बाणेर येथील समस्या | पुढारी

सेवा रस्त्यावर खड्डेच खड्डे; बाणेर येथील समस्या

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: बाणेर येथील ननवरे ब्रिज ते सुसखिंड पुलापर्यंत असलेल्या सर्विस रोडवर (सेवा रस्ता) मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी असणार्‍या सोसायटीमधील नागरिकांनी मागणी करून देखील हे खड्डे बुजवले जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे. खड्डा बुजवण्याची जबाबदारी प्रशासनाकडून कोणाची, हा प्रश्नच अद्यापही अनुत्तरीत आहे. या रस्त्यावर पेरविंकल सोसायटी, ग्रीन स्क्वेअर सोसायटी, द वेस्ट विंग आदी सोसायटी आहेत.

आधीच येथील नागरिक सुसखिंडीतील पुलाच्या कामामुळे त्रस्त झाले होते. महापालिका प्रशासन गरज नसलेल्या ठिकाणी डांबर गाड्या पाठवते. परंतु हे खड्डे प्रशासनाला दिसत नाही का, असा सवालही येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या खड्डे झालेल्या रस्त्यावर खड्डे चुकवताना अनेकदा अपघाती झाले आहेत. या सर्विस रस्त्याचे बाबत पुन्हा एकदा महापालिका प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. नेमका ही दुरुस्ती कोण करणार, याबाबत संभ—म अवस्था असल्याने नागरिकांना आणखी किती दिवस या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.

या रस्त्याचे काम आमच्याकडे विभागाच्या अंतर्गत येत नाही. मात्र, तरी पाहणी करून महामार्ग विभागाशी समन्वय साधून या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला जाईल.

                                                -नितीन उदास, उपायुक्त

Back to top button