वाहतूक कोंडीचा ‘चक्रव्यूह’; घोरपडी, मुंढवा व कोरेगाव पार्क परिसरातील समस्या | पुढारी

वाहतूक कोंडीचा ‘चक्रव्यूह’; घोरपडी, मुंढवा व कोरेगाव पार्क परिसरातील समस्या

मुंढवा; पुढारी वृत्तसेवा: घोरपडी येथील दोन्ही रेल्वेगेटवर उड्डाणपूल उभारण्यासाठी येथील स्थानिक नागरिकांना महापालिका प्रशासनाशी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे येथील अनंत चित्रपटगृह रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. पण, ते इतक्या धीम्या गतीने सुरू आहे, की ते कधी पूर्ण होईल, हे सांगणे कठीण आहे. येथील दुसरे रेल्वेगेट असलेल्या साईबाबा मंदिर रेल्वेगेटच्या ठिकाणी अद्याप उड्डाणपूल उभारणीला सुरुवातच झाली नाही.

ताडीगुत्ता चौक ते कोरेगाव पार्क रस्ता या ठिकाणीदेखील वाहतुकीचे योग्य नियोजन नाही. या ठिकाणी असलेल्या पदपथांची मोडतोड झाली असून, रस्ता वाहतुकीसाठी अरुंद पडत आहे. दररोज सकाळी व सायंकाळी या रस्त्यावर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिस उपाययोजना करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महात्मा फुले चौकदेखील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. मागील दहा वर्षांपासून हा प्रश्न भेडसावत आहे.

मुंढवा येथे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनाने येथे वेळोवेळी पाहणी केली आहे. मात्र, आवश्यक उपायोजना झाल्या नाहीत.
                                                – अभिनव परदेशी, स्थानिक नागरिक, मुंढवा

Back to top button