दौंड : ज्येष्ठ नागरिकाची 2 कोटींची फसवणूक | पुढारी

दौंड : ज्येष्ठ नागरिकाची 2 कोटींची फसवणूक

दौंड : मोजेस डॅनियल यादव (वय 63) यांची दौंड शहरातील दीपमाळ्याजवळ 35 गुंठे जागा आहे. यादव यांना काही दिवसांपूर्वी कॅन्सर झाला होता. उपचारासाठी मोठा खर्च येणार होता, त्यासाठी त्यांनी बांधकाम व्यावसायिक श्रीराम उद्धवराव मांढरे (वय 40, रा. सहकार चौक, दौंड) याला ही जमीन दोन कोटी रुपयांच्या बदल्यात विकली. मांढरे याने बँकेतील बंद खात्याचे वेगवेगळ्या रकमेचे चेक देऊन यादव यांची फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता यादव यांनी मांढरेच्या मागे पैशाचा तगादा लावला, त्या वेळी मांढरे याने पाच ते सहा साथीदारांसह दौंड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक 1589/2017 ची चूक दुरुस्ती करीत आहे, असे सांगून पुन्हा फसवून यादव यांच्या सह्या घेतल्या व यादव यांच्या घरातील सात लोकांचे नावावर सोपानकाका सहकारी बँकेचे वेगवेगळे चेक दिले मात्र हे चेक वटले नाहीत.

जवळपास चार ते पाच वर्षे मांढरे याच्याकडे पैशाचा तगादा लावला, परंतु त्यांनी पैसे काही दिले नाहीत. त्याने विश्वासघात केला. खोटे चेक देऊन फसवणूक केली, असे मोजेस यादव यांनी दौंड पोलीस स्थानकात मांढरे याचे विरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मांढरेसह त्याच्या सहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Back to top button