मळदला दुचाकीच्या धडकेने ज्येष्ठाचा मृत्यू | पुढारी

मळदला दुचाकीच्या धडकेने ज्येष्ठाचा मृत्यू

रावणगाव; पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मळद (ता. दौंड) येथील सेवारस्त्यावरून पायी जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकाला एका पांढर्‍या रंगाच्या स्कूटीने पाठीमागून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 22) उशिरा घडला.
मळद येथील पद्मावती मंदिराजवळून सेवारस्त्याच्या बाजूने पायी चाललेले अप्पा बाबूराव साळवे (वय 70, रा. मळद, ता. दौंड) यांना पाठीमागून येणारी स्कूटी मोटारसायकलने (एमएच 12 एससी 0662) धडक दिली.

या अपघातात अप्पा साळवे यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर स्कूटीचालक पळून गेला. यासंदर्भात प्रकाश सयाजी साळवे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात स्कूटीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कुंभार करीत आहेत.

Back to top button