पुणे : अन्यथा आळंदीचा पाणीपुरवठा बंद | पुढारी

पुणे : अन्यथा आळंदीचा पाणीपुरवठा बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आळंदी नगरपरिषदेने पाणीपट्टी व पंपिंगची 25 लाख 53 हजार रुपयांची थकबाकी न भरल्यास 1 ऑक्टोबरपासून आळंदीचा पाणीपुरवठा बंद केला जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. याबाबत पत्र महापालिकेने आळंदी नगरपरिषदेला पाठविले आहे. आळंदी नगरपरिषदेकडूनही भामा आसखेड धरणातून पाण्याची मागणी केली जात आहे. त्यांना अद्याप पाणी कोटा मंजूर झालेला नाही.

मात्र, प्रक्रिया न केलेले पाणी आळंदी शहरासाठी देण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी 9 फेब—ुवारी दिला होता. त्यानुसार 17 फेब्रुवारीपासून महापालिकेकडून आळंदी शहरासाठी पाणी दिले जाते. महापालिकेने आळंदी नगरपरिषदेला 17 फेब्रुवारी ते 31 मार्च या दिवसाचे 6 लाख 2 हजार 581 रुपये, 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 पर्यंतचे 19 लाख 51 हजार 117 रुपये अशी दोन बिले पाठविली आहेत. मात्र, नगरपरिषदेने ही दोन्ही बिले भरली नाहीत. आणि नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांना महापालिकेशी लेखी किंवा फोनवरून कोणताही संवाद साधलेला नाही, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

Back to top button