भोर : थेट सरपंचपदासाठी चुरस वाढली | पुढारी

भोर : थेट सरपंचपदासाठी चुरस वाढली

भोर; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यात भोलावडे आणि किवत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान येत्या 18 सप्टेंबर रोजी होत आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सरपंचपदासाठी या दोनही ग्रामपंचायतींमध्ये इच्छुकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
भोलावडे ही ग्रामंचायत तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत असून, शुक्रवारी (दि. 2) नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती सरपंचपदासाठी 12 इच्छुकांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

यात प्रवीण बाळासाहेब जगदाळे, राजेंद्र बाळू आवाळे, मंगेश सदाशिव आवाळे, किशोर सदाशिव आवाळे, वैभव सत्यवान आवाळे, बाळासाहेब नामदेव कुंभार, सुनील बबन आवाळे, रमेश विठ्ठल आवाळे, सौरभ मधुकर आवाळे, दत्तात्रय महादेव गावडे, अश्विनी सूर्यकांत माने आणि धनंजय जगन्नाथ आवाळे या इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे. सरपंचपद हे ‘नागरिकांचा मागास प्रवर्गा’साठी राखीव आहे.

या ग्रामपंचायतीचे 4 प्रभागांतून सदस्य निवडून द्यायचे असून, प्रभाग 1 मध्ये 11, प्रभाग 2 मध्ये 12, प्रभाग 3 मध्ये 13 व प्रभाग 4 मधून 9 अशा एकूण 45 इच्छुकांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, खरे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 6 सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे. किवत हे भोलावडे ग्रामपंचायतीतून विभक्त झाले असल्यामुळे ही पहिलीच निवडणूक होत असून, सरपंचपद हे ‘सर्वसाधारण पुरुष’साठी राखीव आहे.

या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 10 इच्छुक उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून, यात पंकज किसन चंदनशिव, अजित पांडुरंग चंदनशिव, संजय सीताराम चव्हाण, रघुनाथ पांडुरंग चंदनशिव, अक्षय यशवंत चव्हाण, मंगल सचिन चंदनशिव, तानाजी अण्णा चंदनशिव, केदार किसन चंदनशिव, चंद्रकांत तुकाराम चंदनशिव व रामचंद्र दिनकर चंदनशिव यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीमधील तीन प्रभागांपैकी 1 नंबर प्रभागातून 13, प्रभाग 2 मधून 5 व प्रभाग 3 मधून 7, असे एकूण 25 उमेदवार इच्छुक असल्याची माहिती मंडल निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धर्माकांबळे, योगेश सरोदे आणि प्रमोद खोपडे यांनी दिली.

Back to top button